संत ज्ञानेश्वर विद्यालयात “रेड कलर डे” उत्साहात साजरा

red colour

जळगाव, प्रतिनिधी | मेहरूण येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात मंगळवारी “रेड कलर डे” साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी लाल रंगाचे कपडे परिधान करीत विविध खेळांमध्ये सहभाग घेतला.

रेड कलर डे निमित्ताने विद्यार्थ्यांना लाल रंगाविषयी माहिती सांगत किरण पाटील यांनी रंगाचा राजा लाल आपल्या जीवनात चैतन्य आणतो असे सांगितले. विद्यार्थ्यांसाठी संगीत खुर्ची, बादलीत चेंडू टाकणे, धावणे अशा स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या. स्पर्धेत तन्वी रविंद्र शेळके, यश घोडेराव, मनिष गाडीलोहार या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक तर युग सुरेश नाथ, स्वरा नालकर, कार्तिक गोंधळी यांनी रौप्य पदक मिळविले. या विद्यार्थ्यांना श्री संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी मुलांनी जेवणाच्या डब्यात लाल रंगाचा खाऊ आणला होता. यात टोमाटो, स्ट्रोबेरी, टमाटे चटणी, गाजर हलवा, सफरचंद असा समावेश होता. कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाईक, मुख्याध्यापिका शीतल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. विद्यालयातील शिक्षक कविता बढे, शोभा सपके, गीता भावसार, रोहिणी शिंदे, आम्रपाली शिरसाठ, छाया केदार, हर्षा काळे, तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content