फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर नगरपालिकेच्या शुध्दीकरण केंद्रातील शुध्द पाण्यात पोहून पाण्याचा आनंद घेताय.. तर दुसरीकडे नागरीकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या फैजपूर नगरपालिका प्रशासनाच्या कारभाराकडे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फैजपूर शहरासाठी शुध्द पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी खिरोदा रोडवर फैजपूर नगरपालिकेचे जलशुध्दीकरण केंद्र आहे. याठिकाणी काही मुलं स्विमींग पुल समजून येथील पाण्यात पोहून पाण्याचा आनंद घेत आहे. परंतू हे पाणी पिण्यासाठी थेट नागरीकांच्या नळाद्वारे पुरवठा केला जात आहे. जलशुध्दीकरण केंद्रात होत असलेल्या प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, फैजपूर नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार सुरू असून सर्व कामे राम भरोसे होत असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार घडल्यानंतर फैजपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना सक्त ताकीद देवून हा प्रकार होणार नाही व नागरीकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जणारा नाही असे अश्वासन मुख्याधिकारी यांनी दिली आहे.