संतापजनक : तरुणीच्या गुप्तांगातून घेतला स्वॅब ; लॅब टेक्निशियन आरोपीला अटक

अमरावती (वृत्तसंस्था) अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एका २४ वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून बलात्कारासह विविध कमलांद्वारे गुन्हा दाखल केला आहे.

 

पिडीत तरुणी अमरावतीमध्ये भावाकडे राहत असून एका मॉलमध्ये नोकरी करते. मॉलमधील कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे २८ जुलै रोजी ट्रामा केअर टेस्टिंग लॅबमध्ये त्याच्या संपर्कातील २० जणांचे स्वॅब घेण्यात आले. मात्र स्वॅब घेणाऱ्या अल्पेश देशमुखने पिडीत तरुणीला परत बोलावत तुमची चाचणी पॉझिटिव्ह आली असून युरिनल तपासणी करावी लागेल,असे सांगितले. त्यानंतर रुणीने सदर बाब वरिष्ठ महिला सहकाऱ्यास कळविली. त्या दोघींनी महिला कर्मचारी नाही का, असे विचारले. त्यावर लॅब टेक्निशियनने महिला नसल्याचे सांगितले. तपासणी करण्यासाठी तुम्ही एका महिलेला सोबत घेऊ शकता, असे म्हटले. त्यानंतर टेक्निशियनने फिर्यादी तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब तपासणी केली. त्यानंतर टेक्निशियनने तुमची टेस्ट निगेटिव्ह असल्याचे सांगितले. योनीद्वारे घेतलेल्या स्वॅब तपासणीबाबत तरुणीस शंका आल्याने तिने त्याबाबत भावाला सांगितले. त्याने डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी अशाप्रकारे चाचणी करत नसल्याचे सांगितले. बडनेरा पोलिसांनी विविध कलमांसह अ‍ॅट्रॉसिटी, आयटी कायद्याच्या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, कोरोनाच्या चाचणीसाठी अशाप्रकारे स्वॅब घेतला जात नाही. हा अत्याचार आहे. याप्रकरणी लॅब टेक्निशियनविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे.

Protected Content