संतापजनक : आजी-आजोबाने बघायला लावले चिमुकलीला अश्लील चाळे, तर मावशीच्या पतीकडून बलात्कार !

पिंपरी (वृत्तसंस्था) आजी आणि आजोबाने आपले अश्लील चाळे अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने बघायला लावले. तर पीडीत मुलीच्या मावशीच्या पतीने पीडीतेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

 

 

फिर्यादी यांची सख्खी आजी व आजोबा यांनी पिडीत मुलीसमोर शाररीक संबंध प्रस्थापित केले व ते पाहण्यास बळजबरी केली. ही घटना २०१४ पासून २०२० पर्यंत वेळापूर, पंचशिल नगर व मसवड येथे घडली आहे. पिडीत मुलगी अश्लील चाळे बघण्यास नकार दिल्यानंतर तिला मारहाण व शिवीगाळ केली जात होती. धक्कादायक म्हणजे पीडीत मुलीसोबत आजोबा यांनी शाररीक अत्याचार केले. तर पिडीत मुलीच्या मावशीच्या पतीने पीडितेला गावाला नेऊन तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात आजी, आजोबा आणि मावशीच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे वर्ग करण्यात आला आहे.

Protected Content