दि. २० जून रोजी तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सुरू होणार आहे. तर दि. २१ जून रोजी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. मागील दोन वर्षांपासून देशात करोना संकट असल्याने नियम व अटींचं पालन करून हा पालखी सोहळा पार पडला आहे. पण यावर्षी करोना संकट काहीसं कमी झालं झालं आहे. त्यामुळे सध्या देहू आणि आळंदी येथे पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. जगद्गुरू संत तुकोबांची पालखी २० जून रोजी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे. दरम्यान, पालखी सोहळ्याची तारीख जाहीर झाल्याने जोरदार तयारी सुरू झाली आहे. अखेर दोन वर्षानंतर हा पालखी सोहळा संपन्न होतोय, त्यामुळे लाखोंच्या संख्येनं वारकरी देहूत दाखल होतील, अशी माहिती माणिक महाराज मोरे यांनी दिली आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानोबा, संत तुकोबांच्या पालखी सोहळ्याच्या तारखा जाहीर !
3 years ago
No Comments