मुंबई (वृत्तसंस्था) राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत.
यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये संजय राऊत आणि शरद पवार यांच्यात एक बैठक होणार आहे. या भेटीत राज्यसभा निवडणूकीबाबत चर्चा होणार असल्याचे कळते. राज्यसभेसाठी राष्ट्रवादी, भाजप यांचे उमेदवार घोषित झाले आहेत. तर काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा येत्या बुधवारी होऊ शकते. दरम्यान, या भेटीत नेमकी काय चर्चा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.