काँग्रेस काढणार भव्य दांडी यात्रा

नवी दिल्ली । महात्मा गांधीजींच्या दांडी यात्रेस ९० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून यंदा काँग्रेसतर्फे याच मार्गावरून यात्रा काढण्यात येणार असून याबाबत आज अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधींनी १२ मार्च १९३० रोजी दांडी यात्रा सुरू केला होती, ती ६ एप्रिल १९३० रोजी संपली होती. या ऐतिहासिक दांडी यात्रेला यंदा ९० वर्षे पूर्ण होत असतांना काँग्रेस देखील यंदा दांडी यात्रा काढणार आहे. काँग्रेसकडून १२ मार्च रोजी काढण्यात येणारी दांडी यात्रा अहमदाबाद येथील साबरमती येथून सुरु होणार असून, ६ एप्रिल पर्यंत चालणार आहे. ही यात्रा २७ दिवसात ३८६ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. तर या २७ दिवसाच्या प्रवासात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी सहभागी होणार आहेत.

दरम्यान, दांडी यात्रेच्या शेवटच्या दिवशी सोनिया गांधी आणि राहुल गांधी जाहीर सभेला संबोधित करू शकतात. यात सर्व काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री, काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख उपस्थित असतील अशी माहितीदेखील समोर आली आहे.

Protected Content