बोदवड प्रतिनिधी । पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज बोदवड शहरातील मुक्ताई मंगल कार्यालयात तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी नागरिकांना विविध समस्यांचा पाढाच वाचला असून पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
बोदवड तालुक्यातील विविध प्रश्नांसाठी आज बोदवड येथे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील नागरिकही उपस्थित होते नागरिकांनी विविध समस्यांचा पाढा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समोर वाचला, या नागरिकांच्या प्रश्नांना संबंधित अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले नागरिकांचे कामे त्वरित सोडवा अशी तंबी दिली अधिकाऱ्यांना गुलाबराव पाटील यांनी दिली या कार्यक्रमासाठी आमदार चंद्रकांत पाटील ,तहसीलदार घोलप,डी वाय एस पी , पोलीस कर्मचारी आरोग्य अधिकारी ,पाणी पुरवठा अधिकारी, गट विकास अधिकारी, विद्युत मंडळाचे अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी वनविभागाचे अधिकारी व्यापारी वर्ग. दिव्यांग संघटना शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते