भुसावळ, प्रतिनिधी । देशात कोरोनामुळे संचारबंदी सुरू असल्याने अनेक कुटूंबाच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.यासाठी प्रशासनाने २५ एन.जी.ओ.संस्थेची मदत घेऊन भुसावळ शहरातील नागरिकांना घरपोच जेवण,धान्य ,गृहपयोगी वस्तू पोहचविण्याचे काम सुरू आहे.
संचारबंदीच्या काळात २५ एन.जी.ओ.संस्थेची मदत घेऊन भुसावळ शहरातील गरजू कुटुंबानी आपल्या नावाची नोंदणी नगरपरिषदेमध्ये केल्यानंतर घरपोच गृहपयोगी वस्तू मिळणार आहे. यासाठी २५ एन.जी.ओ.संस्था प्रशासनाच्या आदेशानुसार शहरात काम करीत आहे. प्रत्येक संस्थेला एरिया ठरवून दिलेला आहे. त्याच एरियामध्ये संस्थांचे काम सुरू आहे. गरजूंची नाव नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आलेले आहे.सर्व शहरातील कामकाज नगरपरिषदेचे कोचोरे पाहत आहे.