भुसावळ, प्रतिनिधी । शहरात भारतीय वाल्मिकी कल्याण सभा नवी दिल्लीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष दिलीप सिंग पचरेवाल यांच्यातर्फे शहरातील रस्त्यावरती बेवारस फिरणाऱ्या गोरगरीब नागरिकांना गरजवंतांना, दवाखान्यातील रुग्णांना, रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड परिसरातील, अनिवासी लॉक डाऊनग्रस्त स्थलांतरित नागरिकांना दोन वेळच्या जेवणाची सोय करत अन्नदान म्हणून खिचडीचे वाटप करण्यात आले.
सध्याच्या कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरती लोकांच्या लॉक डाउनच्या परिस्थितीला बळी पडलेल्या नागरिकांना अत्यंत हाल अपेष्टा होत असल्याने त्यांच्या जेवणाची सोय व्हावी या दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी व माणुसकीची जाण ठेवत समाजाचे आपण देणे लागतो या उदात्त भावनेतून दिलीपसिंग पचरेवाल यांनी आपल्या सहकार्यांसह या गरजूंना खिचडीचे वाटप केल्याने या गरिबांचे चेहऱ्यावरती स्मित खुलले होते. याशिवाय अशा विदारक परिस्थिती अन्नदान करताना प्रशासनाला सहकार्य करत करून नियमांचे पालन करत दिलीपसिंग पंचरेवाला व त्यांचे सहकारी कार्यकर्ते सोशल डिस्टिंक्शन पळून मास्क लावून स्वतःची काळजी घेत अन्नदानाचे कार्य करत आएह्त. यावेळी लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ शी संवाद साधतांना भारतीय वाल्मिकी कल्याण सभेचे महाराष्ट्र प्रदेश प्रदेशाध्यक्ष दिलीप सिंग पंचरेवाल यांनी नागरिकांना प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन न करण्याचे व घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.