संगमनेर : वृत्तसंस्था । तालुक्याला भूकंपाचा धक्का जाणवला . या अनपेक्षित भूकंपामुळे नागररिक काही काळ भयभीत झाले होते
तालुक्यातील बोटा घारगाव परिसरात हा भूकंपाचा धक्का बसला . 2.6 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का असल्याची नोंद झाली आहे दुपारी 04:36 वाजता हा भूकंपाचा धक्का बसला नाशिक पासून 76 किमीवर संगमनेर तालुक्यात भूकंपाचं केंद्र होत नाशिकच्या MERI संस्थेत भूकंपाची नोंद झाली आहे अशी माहिती तहसीलदार अमोल कदम यांनी दिली भुकंपाच्या हादऱ्याने नागरिकांत भीती व्यक्त होत होती माळवाडी, कुरकुटवाडीसह परिसरात भूकंपाचा सौम्य भुकंम्पाचा धक्का जाणवला 84 सेकंद भुकंपाचे हादरे सुरू होते