कोर्टाने सचिन वाझे यांची एनआयए कोठडी वाढवली

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । २५ मार्च म्हणजेच आज  सचिन वाझे यांच्या  कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना विशेष एनआयए न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर एनआयएच्या मागणीनुसार त्यांच्या कोठडीत ३ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे

 

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ कार आणि त्यात असलेल्या जिलेटिनच्या कांड्या या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएनं सचिन वाझेंची ३ एप्रिलपर्यंत कोठडी मिळवली आहे. . या प्रकरणासोबतच आता मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास देखील एनआयएलाच देण्यासंदर्भात ठाणे सत्र न्यायालयाने गुरुवारी महाराष्ट्र एटीएसला आदेश दिले होते. त्यामुळे मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास देखील एनआयए करत असून या दोन्ही प्रकरणांमध्ये सचिन वाझे यांचा काय सहभाग होता, यावर एनआयएकडून त्यांची चौकशी केली जाणार आहे.

 

 

 

 

एटीएसने देखील आज सचिन वाझेंच्या कोठडीसाठी मागणी करण्याची तयारी केली होती. मात्र, त्याआधीच ठाणे सत्र न्यायालयाने प्रकरण हस्तांतरीत करण्याचे आदेश दिले. अँटिलियाबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ कार मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. आणि मनसुख हिरेन यांच्याशी सचिन वाझे यांचे संबंध असल्याचं समोर आलं आहे. शिवाय, मनसुख हिरेन यांच्या पत्नीने देखील सचिन वाझेंचा मनसुख हिरेन यांच्या हत्येमध्ये सहभाग असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर तपास करणाऱ्या एनआयएने तपासात हाती लागलेले धागेदोरे आधार मानून सचिन वाझे यांना अटक केली आहे.

Protected Content