श्री साई बहुउद्देशीय संस्थेतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी रत्न पुरस्काराचे वितरण (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | नाशिक येथील श्री साई बहूउद्देशीय संस्थेतर्फे शैक्षणिक, सांस्कृतिक व पत्रकारिता या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ६० पुरस्कर्त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी रत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

 

श्री साई बहूउद्देशीय संस्थेतर्फे यशवंतराव होळकरांची जयंतीचे औचित्य साधत पुण्यश्लोक अहिल्यादेवी व यशवंतराव होळकर या पुरस्काराचे वितरण कांताई सभागृहात करण्यात आले. या पुरस्कार वितरण समारोहास प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचे वंशज भूषणसिह राजे होळकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी , संस्थेचे संस्थापक संगीता पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. साई बहूउद्देशीय संस्थेस जळगाव जिल्ह्यात शिरसोली येथे स्थापन होऊन ९ वर्ष पूर्ण होऊन आज १० व्या वर्षात पदार्पण केले आहे. आज राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते . महाराष्ट्राच्या३६ जिल्ह्यासह बाहेरील राज्यातील मान्यवरांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा समावेश आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/619773832508997

 

Protected Content