श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयातर्फे ‘हर घर तिरंगा’ जनजागृती फेरी

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमांतर्गत जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरी परिसरात उत्साहात काढण्यात आली. देशभक्तीपर घोषणांनी परिसर विद्यार्थ्यांनी दुमदुमून काढला.

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमांतर्गत जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरी उत्साहात संपन्न झाली.कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे सचिव तथा उपशिक्षक  मुकेश नाईक  यांनी केले. सकाळी ७ वाजता प्रभात फेरीला शाळेतून प्रारंभ झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन उत्साहात सहभाग नोंदवला.

 

“जय जवान, जय किसान”, “भारतमाता कि जय” अशा विविध देशभक्तीपर घोषणांनी मेहरूण परिसरात विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भारत देशाची व तिरंगा झेंड्याची माहिती मुख्याध्यापिका शीतल कोळी यांनी विद्यार्थ्यांना सांगितली.

 

 

प्रसंगी मुख्याध्यापिका शितल कोळी,उपशिक्षिका उज्वला नन्नवरे,साधना शिरसाट ,रूपाली आव्हाड, आम्रपाली शिरसाट,साक्षी जोगी,दिव्या पाटील, सोनाली जाधव, पुनम निकम, कोमल पाटील, नयना अडकमोल, दिनेश पाटील आदींनी सहकार्य केले.

Protected Content