पारोळा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |शहराचे आराध्य दैवत प्रतितिरुपती श्री बालाजी महाराज मंदिर जीर्णोद्धाराचा पाचव्या वर्धापनदिनानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री बालाजी मंदिर जीर्णोद्धार पाचवा वर्धापनदिन निमित्ताने रविवार दि. ८ मे रोजी सकाळी संस्थानचे प्रमुख विश्वस्त श्रीकांत शिंपी व श्री व्यंकटेश बालाजी महाप्रसाद समितीचे अध्यक्ष तथा माजी खासदार ए. टी. पाटील यांच्या हस्ते सहपत्नीक सत्यनारायणाची पूजा होणार आहे. त्यानंतर तीर्थप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत माऊली भजनी मंडळ यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम श्री बालाजी मंदिर परिसरात होणार आहे. या कार्यक्रमांचे भावीक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री बालाजी संस्थान मंडळ व श्री व्यंकटेश बालाजी महाप्रसाद समिती वतीने करण्यात आले आहे.