पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळेच्या लेझीम मंडळ उत्सव समिती अध्यक्षपदी विपुल चौधरी व उपध्यक्षपदी बंटी चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.
पारोळा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळा आझाद चौक पारोळा येथे सालाबाद प्रमाणे लेझीम मंडळ श्री बालाजी रथोत्सव मध्ये दिनांक २५ रोजी बालाजी रथ उत्सव आहे. या निमित्ताने पारोळा शहरातील तीन व्यायाम शाळा व विविध मित्र मंडळ यामध्ये ट्रॅक्टरवर विविध प्रकारचे देखावे सादर करत व लेझीम मंडळ असतात. त्यातील एक श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळेच्या सालाबाद प्रमाणे यावर्षी पण उत्सव जोरात साजरा करणार आहे.
या निमित्ताने अध्यक्ष उपध्यक्ष श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळेच्या सर्व सभासदांच्या उपस्थितीमध्ये उत्सव समितीच्या सर्वांच्या एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली. यात व्यायाम शाळेचे उत्सव समितीचे व अध्यक्षपदी विपुल चौधरी व उपध्यक्षपदी बंटी चौधरी व खजिनदार शुभम चौधरी व बापू मराठे व सचिव प्रसाद चौधरी व प्रशांत चौधरी यांची निवड करण्यात आली.
यावेळी सल्लागार समितीचे भागवत राजाराम चौधरी, दिलीप हिरामण चौधरी, अण्णा नारायण चौधरी, छोटू जगन्नाथ वाणी, व्यायाम शाळेचे सभासद मनोज चौधरी, सोनू मराठे, युगुल वैष्णव, विकास चौधरी, योगेश चौधरी, गणेश चौधरी, गोपाल चौधरी, अतुल चौधरी, धीरज चौधरी, राहुल चौधरी, पंकज चौधरी, जयेश महाराज, भोला चौधरी, महेश चौधरी, भैय्या चौधरी, सुनील चौधरी, राज चौधरी, आकाश चौधरी, जयेश चौधरी, उमेश चौधरी, नंदू चौधरी, शुभम चौधरी, दर्शन बागुल, उज्वल चौधरी, मनोज मराठे, सोनू चौधरी आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन विकास चौधरी यांनी केले. नवीन कार्यकारिणीचे शहरातील व परिसरातील सर्व नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.