भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील श्री क्षेत्र कनाशीच्या श्री चक्रधर स्वामींच्या चरणस्पर्शाने पवित्र अशा चक्रधर स्वामींच्या मंदिराच्या परीसरात भडगांव तालुक्यांतील जय बाबाजी भक्त परीवार मोठ्या संखेने श्रमदानासाठी उपस्थित होउन स्वामींच्या मंदिरात सकाळी श्री बाबाजींची विधी घेतली व त्यानंतर महाश्रमदानाचा शुभारंभ कनाशी गावातील सरपंच श्री विकास बाबुराव पाटिल यांच्या हस्ते श्री बाबाजींच्या प्रतिमेचे पुजनाने करण्यात आले.
श्री बाबाजींनी समाजाच्या उन्नतीसाठीजपानुष्ठान ,यज्ञ,गुरुकुल ,गोसेवा,कृषी-ऋषि सेवा व श्रमदान या परंपरा दिल्या या सर्व परंपरेत प.पु. बाबाजींनी श्रमदान या परंपरेला विशेष महत्व दिले. ६० वर्षांपूर्वी बाबाजींनी सुरू केलेली ही परंपरा किती महत्वाची आहे. हे आपल्या लक्षात येईल कारण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुध्दा “श्रमेव जयते “” हा नारा दिला आहे, हे या परंपरेचे यश आहे हे बघता उत्तराधिकारी श्री .श्री.१००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगीरीजी महाराज यांनी या भव्य महाश्रमदानाचा संकल्प एक वर्षांपूर्वी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या उत्तुंगपुतळ्याच्या चरणापाशी घेतला आहे. श्रमदानाचा अर्थ निस्वार्थ होऊन समाजाच्या कल्याणाचे कार्य करणे ,श्रमदानाने केलेल्या कामाने देशाच्या आर्थिक सुधारणे सोबतच देशाच्या सामुहिक शक्तीमध्ये सुध्दा वाढ होत असते . या बाबाजींनी दिलेल्या संदेशावर आधारीत उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी ज्या विविध क्षेत्रामुळे आपला देश प्रगती पथावर आहे अश्या अध्यात्मिक ,ऐतिहासिक ,आरोग्य ,शिक्षण ,ग्रामस्वच्छता ,दळणवळण,वृषारोपण,जलसिंचन अश्या महत्त्वाच्या क्षेत्रात १२५३४५६७ तास महाश्रमदान करण्याचा संकल्प केला आहे.
एकाच दिवशी भारत देशांतील ५०० ऐतिहासिक व प्राचीन धार्मिक स्थळावर जय बाबाजी भक्त परीवारातील ५०५०० व स्थानिक ५० हजार अशा १ लाख श्रमदान सेवकांचा सहभाग आज रविवारी ४ जून रोजी केला. त्यानिमित्ताने आज रोजी श्री क्षेत्र कनाशीच्या श्री चक्रधर स्वामींच्या चरणस्पर्शाने पवित्र अशा चक्रधर स्वामींच्या मंदिराच्या परीसरात भडगांव तालुक्यांतील जय बाबाजी भक्त परीवार मोठ्या संखेने श्रमदानासाठी उपस्थित होउन स्वामींच्या मंदिरात सकाळी श्री बाबाजींची विधी घेतली व त्यानंतर महाश्रमदानाचा शुभारंभ कनाशी गावातील सरपंच श्री विकास बाबुराव पाटिल यांच्या हस्ते श्री बाबाजींच्या प्रतिमेचे पुजन व श्रीफळ वाढवून करण्यात आले व तसेच कनाशी गावातील रमेश महादु पाटिल ,छोटु सुदाम पुजारी,सुनिल नगराज पुजारी , गुणवंत उत्तराजे साहकार ,व जमा राजेंन्द्र पाटिल उपस्थित होते.
भडगांव येथिल माऊली हॅास्पिटलचे डॅा गणेश सुदर्शन अहिरे यांनी ही सांगितले की, श्रमदान हे हिंदुसंस्कृतीचा मुख्य गाभा आहे राष्ट्रासाठी सर्व मिळुन आपण काम करतो याची दखल ही गिनिज बुक ॲाफ वर्ड रेकॅार्ड याची नोंद घेनार असुन हा सोहळा जय बाबाजी भक्त परीवाराच्या दृष्टिने आपले सदगुरु निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी (मौनगिरीजी)महाराज यांच्या श्रमदान परंपरेला जागतिक स्तरावर नक्कीच घेऊन जाईल ,हे श्रमदानरूपी शिवधनुष्य जे भक्त उचलतील ते निश्चितच प.पु.बाबाजींच्या आशीर्वादास प्राप्त रहातील