यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील बामणोद येथील ग्रामदेवता कुलदैवत श्री एकविरा देवी प्राणप्रतिष्ठान सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
यानिमित्ताने कार्यक्रमाचे नियोजन नुसार सर्व प्रथम एकविरा देवीची ग्राम प्रदक्षिणा उत्साहात आनंदात काढण्यात आली. यावेळी गावातील सर्व समाजाचे, पंथाचे ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला. तुळशी कळस घेऊन चालणाऱ्या महिला, भजनी मंडळ, वही गायनाचा कार्यक्रम मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होते. या ग्राम प्रदिक्षणेचा ग्रामस्थ देवीच्या दर्शनाचा लाभ घेत होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गणपती पूजन, पुण्याहवान पिठस्थ देवता स्थापना विविध धार्मिक विधी भाव भक्तीने पार पडले. तिसरे दिवशी देवी मूर्तीची दशविधीस्नान व प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी देवतांना महाअभिषेक, सप्तपाठ हवन व संध्याकाळी आरती करण्यात आली. तर चौथ्या दिवशी स्थापित देवता पंचोपचार पूजन हवन, बलिदान, पूर्णाहुती व आरती होऊन भव्य महाप्रसाचा लाभ ग्रामस्थांनी घेतला. यावेळी चंडीयागचे ही आयोजन करण्यात आले होते. सर्व कार्यक्रम अतिशय उत्साहात असंख्य भाविकांच्या उपस्थितीत भक्ती भावाच्या वातावरणात पार पडला. या संपुर्ण कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी गावातील जेष्ठ मंडळी सोबत तरुणांनीही परिश्रम घेतले.