जळगाव,प्रतिनिधी । श्रीराम माध्यमिक विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षा विद्यालयातील शिक्षिका प्रतिभा पाटील तर प्रमुख अतिथी विद्यालयाचे मुख्याध्यापक दिवाकर जोशी हे होते,
कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षांनी प्रतिमा पूजन करून केली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कार्या विषयी माहिती अध्यक्षा प्रतिभा पाटील यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन माहिती दिली तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दिवाकर जोशी यांनी राष्ट्रीय एकता दिवस आपण का साजरा करतो याविषयी विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले.यशस्वीतेसाठी दिनेश पाटील, संजय बडगुजर, अतुल चाटे, कर्मचारी विनोद इखे यांनी सहकार्य केले.