फैजपूर प्रतिनिधी । आयोध्या श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण समर्पण निधी अभियाना’च्या प्रचार व प्रसार संदर्भात विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री प्रशांत हरताळकर यांनी फैजपूर शहरात भेट दिली.
याप्रसंगी त्यांनी येथील सतपंथ देवस्थान येथे झालेल्या अभियान कार्यकर्त्यांच्या बैठकीत कार्यकर्ते व राम भक्तांची संवाद साधून या अभियानाचा आढावा व राम समर्पण भाविकांच्या सहवेदना जाणून घेतल्या याप्रकरणी त्यांनी आमचे कुटुंब हे पूर्वाश्रमीचे फैजपूर वाशीअसल्याचा आठवणींना उजाळा दिला. ऐतिहासिक फैजपूर म्हणून परिचित होते मात्र येथे प्रत्यक्ष आलो असता फैजपूर हे पुरातन धार्मिक अध्यात्मिक नगरी आहे, याचा मला आज सार्थ अभिमान वाटतो विहिपच्या कार्य माध्यमातून संपूर्ण भारत भर व विदेशातही भ्रमण होत असते. फैजपूरला आतापर्यंत का येणे झाले नाही याची खंत व्यक्त करीत ही माझी प्रथमच या निमित्त भेट झाली असल्याचे नमूद करून या अभिनाचे जिल्हाप्रमुख महामंडलेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज तसेच समर्पणदाते शहरवाशी व अभियान कार्यकर्ते यांच्या प्रेमाने अक्षरशः भारावून गेल्याच्या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी प्रशांत हरताळकर यांचा सतपंथ देवस्थानाच्या वतीने गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी शाल श्रीफळ पुष्पमाला देऊन स्वागत सत्कार महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराजांनी केले. याप्रसंगी शहरातील राम मंदिर निधी समर्पण करणारे कारसेवक प्रभुदास महाजन, डॉ भरत महाजन, विक्की जयस्वाल, नरेंद्र नारखेडे, सुनील वाडे, डॉ.शैलेश खाचणे, युवराज सराफ, भुसावळ येथून आले दाम्पत्य गणेश सोनार दमयंती सोनार या दात्यांनी जय श्रीराम म्हणत आपले समर्पण महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज व प्रशांत हरताळकर यांना सुपूर्त केले याप्रसंगी धोंडू माळी, नारायण घोडके, जिल्हा प्रचारक स्वप्निल चामणिकर, योगेश भंगाळे यासह अभियानाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.