यावल तालुक्यात चारही पक्षांना संधी; काँग्रेसचा सर्वाधीक ठिकाणी विजयाचा दावा

यावल अय्यूब पटेल । आज जाहीर झालेल्या निकालात तालुक्यात काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या चारही पक्षांना संधी मिळाली आहे. यात काँग्रेसने ४६ पैकी २७ जागांवर विजय मिळविल्याचा दावा केला आहे.

यावल तालुक्यातील ग्राम पंचायतच्या सार्वत्रीक पंचवार्षीक निवडणुकीसाठीची मतमोजणी संपली असुन , महाविकास आघाडीच्या मित्रपक्ष कॉंग्रेसने आपला बालेकिल्ला आबाधीत ठेवला आहे. दिनांक १५ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत४६ ग्रामपंचायत पैक्की२७ ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाचे प्राबल्य असल्याचे दावा पक्षाच्या वतीने करण्यात आला असुन तिन ग्रामपंचायतवर शिवसेनाला सत्ता मिळाली तर ५ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पक्षाने आपले वर्चस्व राखले तर ८ ग्रामपंचायतीवर भाजपा प्रणीत पॅनलने विजय मिळवला असुन इतर ग्रामपंचायतीवर समिश्र विविध पक्षाचे उमेदवार विजय झाले आहे.

दरम्यान यावल तालुक्यातील राजकारणाचे समिकरण बदलणाऱ्या काही महत्वाच्या ग्रामपंचायतचे लागलेले निकाल पुढील प्रमाणे किनगाव ग्राम पंचायतचे विजयी उमेदवार प्रमोद रामराव पाटील यांना मिळालेली मते१४६, सायरा ततिफ तडवी विजयी मते १३३ , किरण वसंत सोनवणे मते ४७२ विजयी ,लुकमान कलंदर तडवी ४०८, शेख मेहमुद रुस्तम ५६१ मते विजयी , अलानुर छबु तडवी मिळालेली मते४६५ विजयी , स्नेहल मिलींद चौधरी मते४६७ विजयी , विजय अरूण वारे मते ३८२ विजयी , साधना राजेन्द्र चौधरी मते ४५१ विजयी , प्रमिलाबाई शांताराम पाटील मते ३४९ विजयी , आंनदा एकनाथ माळी मिळालेली मते ४६२ विजयी , भारती प्रशांत पाटील मते ४०६ , राजेन्द्र धुडकु पाटील मते ३६५ विजयी , याकुब विनायक तडवी मते ३७७ विजयी असे उमेदवार विजयी झाले. काँग्रेसचे जेष्ठ माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांनी आपले वर्चस्व ग्रामपंचायतीवर कायम राखले आहे . तालुक्यातील दुसऱ्या भाजपाचे माजी आमदार स्वर्गीय हरीभाऊ जावळे यांच्या भालोद या गावात भाजपाने ग्रामपंचायत निवडणुकीत पुनश्च आपले वर्चस्व | सिद्ध केले असुन भाजपा प्रणीत पॅनलला १५पैक्की १२ उमेदवार विजयी झाले आहे.

मागील पाच वर्षातील कार्यकाळात विविध गोंधळलेल्या विषयांना घेवुन चर्चेत असलेल्या हिंगोणा ग्रामपंचायतीवर १२सदस्यांपैक्की कॉंग्रेसप्रणीत ७तर भाजपाचे ५ सदस्य विजयी झाल्याचे बोलले जात आहे. यात विजयी उमेदवार छबु खुदाबक्ष तडवी मते ५६२ विजयी , रूपाली भरत नेहते मते ३१९ , भावना पराग कुरकुरे मते ३४५ विजयी , कपील दिनकर खाचणे मते ३१० , सागर राजेन्द्र महाजन मिळालेली मते २९६ विजयी , भैरवी भरत पाटील मते ३९३ , छबु महिताब तडवी मते ६३३ विजयी , रुकसाना फिरोज तडवी मते ६५१ विजयी , सारीका किशोर साळवे मते ६०९ विजयी , शांताराम मांगो तायडे मते ३६१ विजयी , कुसुम भगवान तायडे मते ३५६ विजयी , शेगम नामदार तडवी मते ४४७ , भुषण राजेन्द्र राणे मिळालेली मते ३१३ विजयी , दिनकर चावदस जंगले मते ३४५ आणी कविता विष्णु महाजन विजयी झाल्या असुन त्यांना मिळालेली मते ३७०३ इतकी आहे.

Protected Content