Home राजकीय श्रीकांत शिंदे यांनी माझी सुपारी दिली ! : राऊतांचा धक्कादायक आरोप

श्रीकांत शिंदे यांनी माझी सुपारी दिली ! : राऊतांचा धक्कादायक आरोप

0
37


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासदार श्रीकांत शिंदे यांनी माझ्या खुनाची सुपारी दिली असल्याचा सनसनाटी आरोप खासदार संजय राऊत यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीला आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी या प्रकरणी ठाण्याच्या पोलिस आयुक्तांनाही पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत अनेकांची नावं असल्याची माहिती आहे. या सर्वांकडून आपल्याला धोका असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. राऊत यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे.


Protected Content

Play sound