शौचालय भ्रष्ट्राचार प्रकरणाची सखोल चौकशी करा – वंचित बहुजन आघाडीची मागणी

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  रावेर पंचायत समितीत वैयक्तिक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणाची सखोल चौकशी करून तपास जलतगतीने करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी  वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे

 

शासनाला देलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रावेर पं. स. च्या माध्यमातून राबविलेल्या वैयक्तिक शौचालय योजनेत मोठया प्रमाणात भ्रष्ट्राचार झाल्याने गुन्हा दाखल आहे.   या संदर्भात दिड कोटी रूपयाच्या गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल असून बारा आरोपी अटकेत आहेत.  या प्रकरणात मोठे अधिकारी व कर्मचारी व काही पंटर याच्या माध्यमातून अनुदानाची रक्कम बोगस लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर लाटली असल्याने समजते. तरी या प्रकरणाची उच्चस्तरीय सखोल चौकशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे. देलेल्या निवेदनावर तालुकाध्यक्ष बाळु राजाराम शिरतुरे , शे.याकुब शे.नजिर,  तालुका उपाध्यक्ष सुरेश अटकाळे, लोकेश निंभोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.

 

Protected Content