चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील पिंप्री ब्रु. ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक शौचालय बांधकामासाठी स्वच्छता सुरू असताना अचानक सरपंचावर तिघांनी हल्ला चढवत जबर मारहाण केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील पिंप्री ब्रु. ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन पाटील हे सार्वजनिक शौचालय बांधकामासाठी जेसीबीच्या साहाय्याने १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास साफसफाई करीत होते. त्यावेळी अनिल भानुदास पाटील, संदीप भानुदास पाटील व हर्षल दिलीप पाटील हे त्याठिकाणी येऊन घरासमोर शौचालय बांधू देणार नाही असे सांगून सरपंच सचिन पाटील यांच्यावर हल्ला चढवत विटांनी जबर मारहाण केली. यात सरपंच यांच्या डोक्याला जबर दुखापती झाल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. दरम्यान प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांच्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलिस स्थानकात भादवी कलम- ३२४, ३३७, २९४, ५०६ व ३४ प्रमाणे वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सपोनि पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास संजय पाटील हे करीत आहे.