दमबाजी करणाऱ्याला अटक करा – महसूल अधिकाऱ्यांची मागणी

यावल प्रतिनिधी- येथील तहसीलदार यांच्या दालनात अनधिकृत प्रवेश करून दमदाटी शिवीगाळ वअरेरावीची भाषा वापरणाऱ्या त्या एका राष्ट्रीय पक्षाच्या कार्यकर्त्यास तात्काळ अटक व्हावी त्यास कडक शासन व्हावे या मागणीसाठीचे निवेदन जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांना प्रांत अधिकारी डॉ . अजीत थोरबोले यांच्या मार्गदर्शना सर्व प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी दिले आहे 

या संदर्भातील वृत्त असे की यावल येथे राहणारा पुंडलिक  बाजीराव बारी याने काल दिनांक ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ , ३० वाजेच्या सुमारास यावलच्या तहसील कार्यालयात कोवीड१९च्या संदर्भात तहसीलदार जितेन्द्र कुवर यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक सुरू असतांना तहसीलदार यांच्या दालनात अनधिकृतपणे प्रवेश केला.  तहसीलदार जितेन्द्र कुवर यांना आपण यावल येथील शिव भोजन केन्द्राचा ठेका आम्हास का दिला नाही व आम्ही दिलेल्या तक्रारींची करण्यात विलंब का झाले या विषया घेवुन पुडंलीक बारी याने तहसीलदारांशी असभ्य व बेशिस्त वर्तणुक करून अरेरावीची भाषा वापरून दमदाटी व शिवीगाळ करून कार्यालयात गोंधळ निर्माण केले .

या घटनेच्या संदर्भात तहसीलदार जितेन्द्र कुवर यांनी प्रांत अधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्याशी तात्काळ संपर्क साधुन घडलेल्या घटनेची माहीती अवगत करून आज दिनांक १ ऑक्टोबर रोजी यावल तहसीलचे निवासी नायब तहसीलदार आर .के .पवार , नायब तहसीलदार आर डी पाटील , संगायोच्या नायब तहसीदार बी बी भुसावरे , पुरवठा निरिक्षक अंकीता महाजन , कोषागारचे अव्वल कारकुन एम एफ तडवी ,पुरवठा विभागाचे एस वाय तडवी , दिपक बाविस्कर , दिपक भुतेकर, श्रीमती निशा चव्हाण , आर बी मिस्त्रि यांच्यासह तालुक्यातील मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. 

प्रांत अधिकारी डॉ अजीत थोरबोले यांच्या उपस्थितीत सर्व आंदोलनकर्ते यांनी यावलचे पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांना तहसीलदार जितेन्द्र कुवर यांनी पुडंलीक बाजीराव बारी यांच्याविरुद्ध फिर्याद दिल्याने विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेच्या संदर्भात सायंकाळी जळगाव येथे प्रांत अधिकारी डॉ अजीत थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व प्रांत अधिकारी यांच्या सोबत यावलचे तहसीलदार जितेन्द्र कुवर , रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे, जळगाव तहसीलदार , चोपडा तहसीलदार , भुसावळ तहसीलदार , मुक्ताईनगर तहसीलदार , जामनेर तहसीलदार यांच्यासह जिल्ह्यातील महसुलच्या विविध अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांना निवेदन दिले आहे. 

जोपर्यंत या घटनेतील यावल संशयीत आरोपी पुडंलीक बारी याला अटक होत नाही तोपर्यंत महसुलचे कामबंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे उपस्थितीत सर्व महसुलच्या कर्मचारी व अधिकारी यांनी म्हटले आहे. तरी शासनाने तात्काळ या विषयात लक्ष देवुन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्याकडे करण्यात आली आहे.

Protected Content