शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत मका जळून खाक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आव्हाणा शिवारातील शेतात ईलक्ट्रीक तारांच्या शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत शेतातील सव्वा लाख रूपये किंमतीचा मका जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुरूवार २३ मार्च रोजी रात्री १० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आव्हाणा येथे प्रदीप मंगल पाटील (वय-४१) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे आव्हाणा शिवारातील शेत गट नंबर ५१७ मध्ये शेत आहे. शेतात त्यांनी रब्बी हंगामात मकाचे कणीस काढून ठेवलेले होते. बुधवारी २२ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेतातून गेलेल्या विद्यूत तारांच्या शॉर्टसर्कीटमुळे शेतातील मकाला आग लागली. यात मकासह चारा जळून खाक झाले आहे. यात शेतकऱ्याचे १ लाख २५ हजारांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी गुरूवारी २३ मार्च रोजी रात्री १० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक गुलाब माळी हे करीत आहे.

Protected Content