जळगाव प्रतिनिधी । शार्टसर्किटमुळे आग लागून शेतातील मका तसेच चारा जळून खाक झाल्याची घटना ८ मे रोजी दुपारी ३ वाजता घडली होती. आगीत दहा ते 12 हजार रुपयांचे नुकसान झाले असून याप्रकरणी मंगळवारी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील कुर्हाळदा येथील अशोक रामचंद्र पाटील वय 32 यांचे दापोरा शिवारात गट नं 255/2 येथे शेत आहे. शेताचे एक हेक्टर व 24 आर एवढे क्षेत्रफळ आहे. 8 मे रोजी दुपारी शॉर्टसर्किने अचानक आग लागली. आगीत शेतातील मका तसेच चार्याच्या पेंढ्या जळून खाक झाल्या. अशोक पाटील यांना प्रकाबाबत माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळ गाठले असता तोपर्यंत शेतातील दहा ते 12 हजार रुपये किमतीचा मका तसेच चारा जळून खाक झाला होता. याप्रकरणी शेतमालक अशोक पाटील यांनी मंगळवारी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक प्रफुल्ल धांडे करीत आहेत.