शेळगाव बॅरेजच्या बॅकवॉटर पुलाचे ‘हरीसागर’ असे नामकरण करा; भाजपाची मागणी

यावल प्रतिनिधी । अंजाळे ते भुसावळ या शेळगाव बॅरेजच्या बॅकवॉटर पुलाला हरीसागर नामकरण करावी अशी मागणी भाजपाच्या वतीने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील येथे राहणारे माजी आमदार स्व.हरिभाऊ जावळे यांचे 16 जून रोजी निधन झाले आहे. स्व. जावळे यांचे सामाजिक योगदान अत्यंत महत्वपूर्ण व मोलाचे आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीत दोन वेळा खासदार तसेच दोन वेळा आमदार राहिलेले आहेत. स्व. जावळे यांनी घेतलेला वसा आजन्म जोपासला, शेतकऱ्यांचे प्रश्नांसाठी त्यांनी पुढील लोकसभेतही विधानसभा विधानसभा सभागृहात अभ्यासपूर्ण विवेचन करून आवाज उठविला. खास करून केळीसाठी तसेच केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांनी नेहमीच संघर्षाची भूमिका ठेवली व तह्यात जोपासली, सिंचनाचे प्रश्न सूक्ष्म सिंचन माती पाणी परीक्षण, नदीचे सर्वेक्षण, केळी प्रक्रिया, उद्योग अशा वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यावर उपाय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेती उत्पादनाच्या माध्यमातून संपूर्ण शेतकरी बनवण्याच्या कार्य त्यांनी आयुष्यभर ठेवले होते व्यक्तिगत हानी व लाभ याचा विचार न करता राजकीय पक्षीय भूमिका बाजूला सारून त्यांनी एका तपस्याप्रमाणे जीवन सार्वजनिक कार्यासाठी वेचले. त्यातूनच त्यांची राजकीय संत अशी प्रतिमा जनमानसात तयार झालेली आहे व ती कायम राहणारच यात शंका नाही. त्यांच्या या कार्याचा लाभ तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्षात झाला आहे. यात कोणाचेही दुमत नसावे तर अशा तपासी राजकीय संताच्या स्मृती चे लोक मनात कायम जतन व्हावे व त्यांच्या कार्याचा आदर्श अनेकांना मार्गदर्शक व्हावा. यासाठी भारतीय जनता पक्ष यावल तालुकाच्या वतीने यावल तालुक्याच्या दक्षिणेकडील कोट्यावधी रुपये खर्च करून बांधले जात असलेल्या शेळगाव बॅरेज महत्वकांशी धरणाचे कार्य शेवटच्या टप्प्यात असून व ते पूर्णत्वाकडे जात आहे. या शेळगाव बेरजेच्या बॅकवाटरमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार असून या शेळगाव व्हिलेजचे काम पूर्ण व्हावे. याकरिता स्व.हरिभाऊ जावळे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये सातत्याने पाठपुरावा केला असून याकरिता या शेळगाव बॅरेजचे भुसावळ ते अंजाळे येथील बॅकवॉटर पूलाचे नामकरण हरीसागर करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे यावल तालुकाध्यक्ष उमेश फेगडे यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भातील निवेदन त्यांनी यावल येथील तहसीलदार जितेंद्र कुवर व निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांना दिले. याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती राकेश फेगडे, भाजपाचे यावल शहराध्यक्ष निलेश फेगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती उमेश पाटील व भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रितेश बारी हे याप्रसंगी उपस्थित होते.

Protected Content