Home Cities जामनेर शेरी येथे वादळी पावसामुळे मृत्यूमुखी पडलेल्या माकडावर अंत्यसंस्कार

शेरी येथे वादळी पावसामुळे मृत्यूमुखी पडलेल्या माकडावर अंत्यसंस्कार


पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या शेरी गावात गुरूवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे मृत्यूमुखी पडलेल्या माकडावर शेरी व पहूर येथील तरूणांनी अंत्यसंस्कार करत माणूसकीचे दर्शन घडविले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, काल रात्री पहूर सह परीसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यात शेरी येथे एका माकडाचा मृत्यू झाल्याचे समजताच पहूर येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन कुमावत, स्वप्नील कुमावत, प्रेम जाधव यांनी व त्यांच्या मित्रांनी माकडाचे विधीवत पुजन करण्यात येवून अंत्यसंस्कार करण्यात आले. माकडावर अंत्यसंस्कार करून या तरूणांनी माणूसकीचे दर्शन घडविले.


Protected Content

Play sound