जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नांद्रा शिवारातून शेतकऱ्याची १० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल चोरट्यांनी लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, समाधान माधव सोनवणे (वय-५०) रा. नांद्रा बुद्रुक ता.जि.जळगाव हे आपल्या परिवारासह राहत असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. १४ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ते नांद्रा शिवारात त्यांची मोटारसायकल (एमएच १९ एजी ९०५९) ने शेतात गेले होता. त्यावेळी त्यांनी आमोदा ते कानळदा रस्त्यावर मोटारसायकल पार्कींग करून लावलेली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांची १० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल चोरून नेल्याचे उघडकीला आले. त्यांनी मोटारसायकलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी आढळून आली नाही. अखेर ११ महिन्यानंतर समाधान सोनवणे यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ हरीलाल पाटील करीत आहे.