शेतातील शेडमधून कापसाची चोरी; शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील लोण खुर्द शेत शिवारातील शेड फोडून सुमारे १ लाख ६० हजार रूपये किंमतीचा कापूस चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी १० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनेश निंबा साळुंखे (वय-४५) रा. लोण खुर्द ता. अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या शेतात पत्र्याचे शेड केले आहे. यात त्यांनी शेतातून काढलेला कापूस ठेवलेला होता. ९ जानेवारी ते १० जानेवारी दरम्यान, शेतातील पत्राच्या शेडमधून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ६० हजार रुपये किमतीचे कापूस चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेतातील सालदार संतोष भिला पाटील यांनी शेतमालक दिनेश साळुंखे यांना फोन करून चोरी झाल्याचे सांगितले. त्यानुसार दिनेश साळुंखे हे घटनास्थळी दाखल झाले असता त्यांच्या शेडच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत ठेवलेला कापूस चोरून नेल्याचे दिसून आले. मंगळवारी १० जानेवारी रोजी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करीत आहे.

Protected Content