शेतातील गोडावून फोडून कापूस लांबविला

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील बांबरुड शेत शिवारातून ९६ हजार रुपये किमतीचे कापसाचे ४० गाठोडे आज्ञात चोरट्यांनी चोरून नेण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भडगाव पोलीसांनी दिलेल्या माहिती अशी की, भगवान अभिमान पाटील (वय-५८) रा. बांबरूळ ता. भडगाव जि. जळगाव यांचे बांबरुळ शिवारात शेत असून शेतात त्यांनी कापूसची लागवड केलेली आहे. दरम्यान मजुरांच्या मदतीने त्यांनी कापूस वेचणी करून त्यांच्या शेतातील गोडावूनमध्ये ठेवण्यात आलेला होता. ३० नोव्हेंबर रात्री ९ ते १ डिसेंबर सकाळी ५ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने शेतातील बांधलेले गोदाम फोडून त्यातून सर्वांना ९६ हजार रुपये किमतीचे १२ क्विंटल कापूस चोरून नेल्याच्या समोर आले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकरी भगवान पाटील यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किरण पाटील करीत आहे.

Protected Content