पाचोरा, प्रतिनिधी | शासनाने मात्तोश्री ग्रामसंमृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतरस्ते तयार करण्याची योजना आखली आहे. मात्र काही शेतकरी अडचणी निर्माण करत आहेत. यामुळे अशांवर गुन्हा दाखल करावा असे आवाहन आ. किशोर पाटील यांनी आढावा बैठकीत केले आहेत.
राज्य शासनाने मात्तोश्री ग्रामसंमृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी शेतरस्ते तयार करण्याची योजना आणली होती. मात्र त्यात अनेक तांत्रिक अडचणी व शेतकरी अडचण निर्माण करीत असल्याचे प्रकार समोर येत आहे. त्यामुळे हि योजना अपूर्ण राहिल्याचे चित्र सध्या दिसत आहे. दरम्यान अनेक शेतकरी आपल्या शेतातून शेतरस्ता न देण्यासाठी तहसिलदार, उपविभागीय अधिकारी व थेट न्यायालयात याचिका दाखल करण्यात येत आहे. तत्पूर्वी शासनाने नुकतेच ११ नोव्हेंबर २०२१ रोजी नविन परीपत्रक जारी करून ते आता मनरेगा ऐवजी “मात्तोश्री ग्रामसंमृद्धी” शेत / पाणंद रस्ते नावाची नविन योजना राबविण्यात येत आहे. सुमारे दोन किलोमीटरच्या रस्त्यासाठी आता २४ लाख रुपयाची योजना हाती घेतली आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी प्रथमच ग्रामपंचायती सोबत महसूल, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा सहभाग घेण्यात आला आहे. ही योजना सुरू करण्यासाठी पाचोरा येथे जळगांव जिल्हयात सर्वप्रथम आमदार किशोर पाटील यांचे अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपूत, पदमसिंग परदेशी, माजी जिल्हा परिषद सदस्य, उद्धव मराठे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील, नायब तहसिलदार मोहन सोनार, माजी सभापती सुभाष पाटील, माजी उपसभापती अनिता पवार, पंचायत समिती सदस्य ललित वाघ, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, प्रकाश एकनाथ पाटील आदी उपस्थित होते.
पाचोरा येथील राजीव गांधी टाऊन हॉल मध्ये झालेल्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार किशोर पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी मातोश्री ग्राम समृद्धी रस्ते / पाणंद रस्ते ही योजना अतिशय सुवर्ण संधी असून गावाच्या विकासासाठी शेतकऱ्यांनी अडचण निर्माण करु नये, सरपंचांनी आपणास गावाचा मुख्यमंत्री समजून निपक्षपाती पणे काम करावे, येत्या तीन दिवसात रस्याच्या कामासाठी ग्रामसभा घेऊन आजूबाजूच्या शेतकऱ्यांची संमती मिळवून जास्तीतजास्त रस्त्याचे कामाचे ठराव मंजूर करून ते पंचायत समिती कडे जमा करावे. जे शेतकरी या कामात अडथळा निर्माण करतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचेवर थेट शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा (३५३ कलम) गुन्हा दाखल करावा. यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू. असे आवाहन आ. किशोर पाटील यांनी केले आहेत. तसेच तालुक्यात १०० ग्रामपंचायती असुन त्यापैकी ५१ महिला सरपंच आहेत. मात्र याठिकाणी पतीच कार्यभार हाकत आहेत. त्यामुळे महिलांमध्ये गावाच्या कायभाराची निर्णय घेण्याची क्षमता कधी व कशी येईल ? याबाबत आमदार पाटील यांनी नाराजी व्यक्त करत ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत ज्या महिला निवडून आल्या असतील त्यांनाच बसु देण्याचा आग्रह विरोधी पक्षांनी धरावा असेही आमदार पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमात गटविकास अधिकारी अतुल पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, मधुकर काटे, माजी सभापती सुभाष पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पी. एम. टेकाडे, अनंत शेलार, दिलीप सुरवाडे, सुनिल पाटील, राजकुमार धस, उप अभियंता चंद्रकांत वाडिले, पी. बी. पाटील, आर. आर. बोरसे, बी. ए. पाटील, सरपंच अक्षयकुमार जैस्वाल, सुनिल पाटील, वसंत पाटील, मदन तडवी, सुभाष पाटील, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार गोराडे, नंदकुमार पाटील, सुनिल पवार, गजानन नन्नवरे, नारायण परदेशी, युवराज आडागडे, संजय पाटील, नरेश आल्लाद, बी. बी. मोरे, संतोष शिवनेकर, तालुक्यातील ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंच उपस्थित होते.