शेतमालाचं ‘सोनं’ करण्यासाठी खास किसान एक्सप्रेस ! (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते देवळाली – दानापूर किसान एक्सप्रेस गाडीला ऑनलाईनद्वारे हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास जळगावात दाखल झाली.

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याहस्ते शुक्रवार ८ ऑगस्ट रोजी देवळाली व दानापूर दरम्यान पहिल्या किसान रेल्वेच्या उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेल्वे मंत्री पीयूष गोयल होते. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, आणि डॉ.नरेंद्र जाधव यांच्यासमवेत सरोज अहिरे, विधानसभेचे सदस्य ऑनलाईनद्वारे संबोधित केले.

जळगाव जंक्शनला किसान रेल्वे दाखल
जळगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक तीन वर दुपारी ३.४२ मिनीटांनी किसान रेल्वे दाखल झाली. रेल्वे येणार असल्याने एमआयडीसीमधील चटई कंपनीचे २० पार्सल (१६.८० टन वाजनाचे) बोगी क्रमांक १० मध्ये टाकण्यात आले. पार्सल टाकल्यानंतर किसान रेल्वे ३.५० वाजता भुसावळकडे रवाना झाली. यावेळी स्टेशन व्यवस्थापक ए.एन. अग्रवाल, स्टेशन मास्टर अरूण देशमुख, डी.एम.परदेशी, रमाकांत चौधरी, समाधान पवार, चंद्रशेखर सराफ आदी रेल्वे अधिकारी व कर्मचारी उपस्थिती होते.

रेल्वेची अशी राहणार दैनंदिनी
चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात कृषी व नाशवंत उत्पादनांच्या अखंड पुरवठा साखळीसाठी “किसान रेल” सुरू करण्याच्या घोषणेनुसार, रेल्वे मंत्रालय ने दि. 7 ऑगस्ट रोजी देवळाली ते दानापूर पर्यंतची पहिली किसान पार्सल रेलगाडीची सुरुवात होत आहे. गाड़ी क्रमांक 00107 डाउन साप्ताहिक किसान रेल्वे दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता देवळाली येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 18.45 वाजता दानापूरला पोहोचेल. गाड़ी क्रमांक 00108 अप साप्ताहिक किसान रेल्वे दर रविवारी दुपारी 12 वाजता दानापूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 19.45 वाजता देवळालीला पोहोचेल. या गाड़ीमध्ये 10 पार्सल व्हॅन आणि एक लगेज कम ब्रेक व्हॅन असेल. किसान रेल एकूण परिवहन वेळ 31.45 तासात 1519 किमी अंतर व्यापेल. नाशिक रोड, मनमाड जंक्शन, जळगाव, भुसावळ जंक्शन, बुरहानपूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन आणि बक्सर येथे हे स्थानक थांबेल. मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग हा प्रामुख्याने कृषी आधारित क्षेत्र आहे, जिथे भाजीपाला (विशेषत: कांदे), फळे, फुले व इतर कृषी उत्पादनांची मोठ्या प्रमाणात उत्पादकता आहे आणि पाटणा-अलाहाबाद- कटनी- येथे या उत्पादनांना मोठी मागणी आहे. सतना प्रदेश, किसान रेल त्यांच्या उत्पादनांसाठी चांगला बाजारपेठ उपलब्ध करुन देईल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा म्हणून स्थानिक शेतकरी, व्यापारी आणि एपीएमसी यांच्या सहकार्याने मध्य रेल्वेकडून जास्त विपणन केले जात आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/298616008056506/

Protected Content