फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील सातपुडा पतसंस्थेचे चेअरमन तथा यावल शेतकी संघाचे माजी चेअरमन चंद्रशेखर देविदास चौधरी यांची यावल तालुका शेतकी सह खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालक पदी मिटिंग मध्ये सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
यावल तालुका शेतकी सह खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालक पदी निवड त्यांचे निवडीबद्दल आ. शिरीष चौधरी, जि प गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, चेअरमन सुनील फिरके, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, फैजपूर नगराध्यक्ष महानंदा होले, नगरसेवक बापू वाघुळदे, जळगाव दूध संघ संचालक हेमराज चौधरी, काँग्रेस गटनेते कलीम मन्यार, भाजपा शहर अध्यक्ष अनंता नेहेते, रियाज मिस्त्री, केतन किरंगे, देवेंद्र बेंडाळे, डॉ सतीश चौधरी, हेमंत चौधरी,नितीन नेमाडे, आशाताई अग्रवाल, यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.