जळगाव,प्रतिनिधी । आगामी २०२०-२०२१ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्ग ज्या शेतकऱ्यांकडे फळबाग लागवडीसाठी गावातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक यांचेशी संपर्क साधून त्यांचे योग्य ते मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत सिंचनाची सोय उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीसाठी तसेच कंपोस्ट खत निर्मितीसाठी नॅडपे, गांडूळ खत निर्मितीसाठी गांडूळ खत उत्पादन युनिट, विहिर पुर्नभरण, शेततळे इत्यादी घटकांचा लाभ घेणेसाठी गावातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक यांचेशी संपर्क साधावा त्यांचे योग्य ते मार्गदर्शन घ्यावे. अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्याच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.