मुक्ताईनगर, प्रतिनिधी । तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळी पिकांचे नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांना मदत मिळावी व पिक विम्याचे निकष बदलवून पूर्ववत करावे असे निवेदन भाजपा मुक्ताईनगरच्यावतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले
निवेदनात म्हटले आहे की, मुक्ताईनगर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळी पिकाचे तसेच राहत्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, कोरोनामुळे आधीच शेतकरी चिंतेत आहे,तालुक्यातील शेतकऱ्यांना विजबिल माफ करण्यात यावे भाजपा तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे यांनी हे निवेदन दिले .
यावेळी माजी पालकमंत्री आ.गिरिष महाजन, खा. रक्षा खडसे, खा.उन्मेष पाटील, जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, चैनसुख संचेती, आ. संजय सावकारे, आ. मंगेश चव्हाण, आ. चंदूलाल पटेल, बेटी बचाव बेटी पढ़ावचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फड़के, श्रीमती स्मिता वाघ, जि. प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, सुरेश धनके, भा.ज.पा जिल्हा उपाध्यक्ष नंदु महाजन, अशोक कांडेलकर, जि प सदस्या वनिता गवळे, जिल्हा सरचिटणीस संतोष खोरखेडे, नगराध्यक्षा नजमा तडवी, ललित महाजन, राजुभाऊ सवळे, चंद्रकांत भोलाने, विनोद पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, मोहन महाजन, दत्ता पाटील, कुऱ्हा शहराध्यक्ष रवी राजपूत, विजू तळेले तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.