जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांची लूट प्रकरणी दाखल गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता अटक केली आहे. त्याच्यावर पुढील कारवाईसाठी भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, शेतकऱ्यांना लुट करण्याच्या प्रकरणात भडगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात २ वर्षांपासून फरार असलेला संशयित आरोपी शाहरुख रज्जाक तडवी याला अटक करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिले होते. त्यानुसार संशयित आरोपी हा पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे आला असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचाना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पोलीस नाईक रणजीत जाधव, किशोर राठोड, श्रीकृष्ण देशमुख हे पथकाने संशयित आरोपी शाहरुख रज्जाक तडवी (वय-२५) रा. कोल्हे ता. पाचोरा जि.जळगाव याला पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथून रविवारी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता सापळा रचून अटक केली. याबाबत पोलिसांनी संशयित आरोपीला पुढील कारवाई करण्यासाठी भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.