जळगाव प्रतिनिधी । शेतकरी देशाच्या पाठीचा कणा , पाया आहे ; मोदी सरकारने मग्रुरी सोडावी चर्चेसाठी सरकारने त्यांच्या दारात जावे असे प्रतिपादन आज पालकमंत्री व पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी केले .
पाळधी येथे एक विवाह सोहळ्यात आल्यावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले कि , सेलिब्रिटींना आता कुठे जग आली आहे कि शेतकऱ्यांचे आंदोलन कशा पद्धतीने केले पाहिजे मुंबईच्या आझाद मैदानापासून दिल्लीच्या मैदानापर्यंत शेतकरी ६० दिवसांपासून मागणी करतोय आमच्या शेतकऱ्याला भाव द्या आमच्या शेतकऱ्याची जमीन हिसकावण्याचा जो प्रयत्न होतोय त्याकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे पण हे सरकार मग्रूर आहे . उलटपक्षी म्हणत आहे की तुम्ही आंदोलन मागे घेऊन आमच्याकडे या .
भाजपाचे राष्ट्रीय नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांना सव्वा वर्षांनी शुद्ध आली. याचा मला आनंद आहे, अशा शब्दात शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी अमित शाह यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. गुलाबराव पाटील यांनी यावेळी अमित शाह यांच्या टीकेला तर प्रत्युत्तर दिलेच, याशिवाय शेतकरी आंदोलनाबाबत सेलेब्रिटिंनी केलेल्या ट्विटचा देखील समाचार घेतला.
https://www.facebook.com/508992935887325/videos/274875814267469