चाळीसगाव, प्रतिनिधी । कृषी विभागामार्फत चाळीसगाव तालुक्यात खरीप हंगाम पूर्व तंत्रज्ञान प्रचार व प्रसिद्धी मोहीम मे महिन्यात राबविण्यात येत आहे. याबाबत कृषी पर्यवेक्षक मनोज सैंदाणे यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी साधला संवाद
मनोज सैंदाणे यांनी दिलेली माहिती : या मोहिमेचा आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळून जास्तीचा नफा मिळून बळीराजाचे आर्थिक सबलीकरण व्हावे प्रमुख उद्देश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या ऑनलाईन बैठकींचे आयोजन करण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच वापर करून शेतकऱ्यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून माहिती दिली जात आहे.
मे महिन्यात अशी असेल मोहीम :
पहिला आठवडा – सोयाबीन बियाणे उगवन क्षमता चाचणी प्रत्येक्षिक मोहीम
दुसरा आठवडा – दहा टक्के रासायनिक खते कमी करण्याची मोहीम
तिसरा आठवडा – बीबीएम पेरणी मोहीम
चौथा आठवडा – बीज प्रकिया मोहीम
पहा काय म्हणले कृषी पर्यवेक्षक मनोज सैंदाणे
https://www.facebook.com/508992935887325/videos/1115753868909569