जळगाव प्रतिनिधी ।शेतकरी कामगार पक्षातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी निदर्शने व आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, आपल्या अधिकाराचे रक्षण, लोकशाहीचे सरक्षण करण्यासाठी आणि मोदीसरकारच्या कामगार विरोधी, शेतकरी विरोधी आणि देश किरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी कामगार शेतकरी व सर्व सामान्य वर्गाने पुढाकार घेतला पाहिजे. 26 नोव्हेबर म्हणजेच संविधान दिन व आपले संविधान व आपली लोकशाही संकटात आहे. 26 नोव्हेंबर रेाजी देशातले सर्व कामगार
शेतकरी, शेतमजूर पशु पालक , मच्छीमार आदिवासी छोटे व्यापारी वाहतुकदार ग्रामिण कारागिर 12 बलुतेदार इत्यादी व्यापक जन विभागांचा एक दिवसांचा ऐतिहासिक आंदोलन करण्यात येत आहे.
या आहेत मागण्या
कामगारांचे अगोदरचे सर्व कामगार कायदे पुर्नस्थापित करा, शेतकरी विरोधी कायदे त्वरीत मागे घ्या, विज विधेयक 2020 त्वरीत मागे घ्या. रोजगार हमी कायदा लागु करा, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करून प्रत्येक तालुक्यात दर्जेदार सार्वजनिक हॉस्पिटलची उभारणी करा. फेरीवाल्यांना लागु असलेल्या राष्ट्रीय धोरणांची अंमलबजावणी करा. असंघटीत कामगारांना आरोग्य विमा व रूपये 3000/- मासिक पेन्शन सुरू करा. नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा.यास इतर मागण्या रद्द करा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत