शेगांव, प्रतिनिधी । महिला पतंजली योग समिती व जायंटस् सहेली ग्रुप तसेच युवा विकास बहुउद्देशीय संस्था अमरावती यांच्यावतीने आयोजित जागतीक महिला दिनानिमित्त सांस्कृतीक कार्यक्रम जागर महिला शक्तीचा ८ मार्च , दु. १२.३० ते ४ मथुरा लॉन, शेगांव येथे आयोजित करण्यात आला आहे.
स्त्रीयांचे हक्क व अधिकारासाठी ११२ वर्षापूर्वी स्त्रीयांनी जो लढा दिला त्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. संतनगरीच्या महिला भगिनींना खूले व्यासपिठ मिळावे या उद्देशाने शेगांव नगरीत प्रथमच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना पुरुषांबरोबरीचे स्थान, स्वसंरक्षणाचे धडे मिळाले व समान संधी मिळायी महिलांचे सक्षमीकरण व्हावे, प्रोत्साहन मिळावे, महिला शक्तीचा आदर, मातृत्वाचा सन्मान व्हावा या मूळ उद्देशाने महिलाशक्तीने विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तहसिलदार शिल्पा बोबडे, शेगाव तर उद्घाटक म्हणून नगराध्यक्ष शकुंतलाताई बुच, प्रमुख अतिथी भारतीताई शेंडे, राजकुमारीताई भट्टड, माधुरीताई देशमुख, महिला पतंजली योग समिती जिल्हाध्यक्षा सुनिताताई चांडक आदी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये विशेष आकर्षण मुलींचा सर्वागिण विकास व्हावा यासाठी खास एकलव्य धर्नुविद्या अॅकॅडमी यांचा सायकल मल्लखांब व रोप मल्लखांब यांचे नेत्रदिपक प्रात्यक्षिक सर्व महिला पुरुषांनी यासंधीचा लाभ घ्यावा. आपली उपस्थिती अपेक्षित आहे असे आवाहन वर्षा सरप, जायंटस् सहेली अध्यक्षा वृषाली भारंबे , युवा विकास बहुउद्देशिय संस्था अमरावतीच्या लावण्या असंबे, वर्षा तायडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. कार्यक्रमानंतर घरगुती स्वादिष्ट पदार्थांचा आनंद मेला राहणार आहे.