शेगाव प्रतिनिधी । शेगाव खाटू श्याम परिवार यांच्यातर्फे नवम फागोत्सव निमित्त शुक्रवार 6 मार्च रोजी ‘फाल्गुन के रंग बाबा शाम के संग’ अनुषंगाने श्याम बाबा यांच्या भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन श्री श्याम धाम अग्रसेन भवन परिसरामध्ये करण्यात आले आहे.
दिल्ली येथील प्रख्यात भजन गायिका शिखा भार्गव व इंदोर येथील प्रख्यात भजन गायक सौरभ शर्मा यांच्या मधुर वाणीतून आवाजात श्री श्याम धाम, श्री अग्रसेन भवन परिसरात ६ मार्च रोजी सकाळी ६ वाजेपासून भजनाच्या कार्यक्रमाचा प्रारंभ होणार आहे. सकाळी ६ वाजता बाबा शाम परिवारात धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण फाल्गुन शुध्द एकादशी या तिथीनिमित्त श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातून ढोल ताशाच्या गजरात श्री खाटू श्याम परिवाराच्या भक्तांच्या उपस्थितीमध्ये शहरातील विविध मार्गावरून भव्य निशाण यात्रा काढण्यात येणार आहे. श्रींच्या मंदिरातून प्रारंभ झालेली ही निशाण यात्रा लहुजी वस्ताद चौक, संत गाडगेबाबा चौक, प्राचीन हनुमान मंदिराजवळून गांधीचौक, मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्रीअग्रसेन महाराज चौक या मार्गाने मार्गक्रमण करीत श्रीश्याम धाम अग्रेसन भवन प्रांगण शेगाव येथे पोहोचणार आहे या निशाण यात्रेचे मार्गात श्याम भक्ताकडून ठीक ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता दिल्ली येथील प्रख्यात भजन गायिका शिखा भार्गव व इंदोर येथील सौरव शर्मा यांच्या मधुरवाणीत भजन संध्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. संतनगरी शेगाव शहरात आयोजित या धार्मिक सोहळ्याला शेगाव खामगाव नांदुरा मलकापूर सह विविध शहरातील व तालुक्यातील श्याम भक्तांनी व धर्मप्रेमी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खाटू श्याम परिवार यांच्यातर्फे करण्यात आले आहे.