शेंदूर्णी येथे १० वी बोर्ड परीक्षेत मुलीच अव्वल

शेंदूर्णी प्रतिनिधी । येथील आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय , श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय, ललवाणी माध्यमिक विद्यालय या शाळांचा इयत्ता १० बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून तीनही विद्यालयात मुलींनी प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.

 

डॉ. हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयाने इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. शाळेचा एकुण निकाल १०० % लागला. विधी अतुल जहागीरदार या विद्यार्थ्यांनीने ९८.६०  % गुण मिळवत केंद्रात प्रथम क्रमांक मिळविला ,द्वितीय – पियुष भगवान जाधव ९७.६०  %, तृतीय – हर्षदा अरविंद महाजन ९७.४०  % आली आहे. येथिलच आचार्य गजाननराव गरुड महाविद्यालयाचा १०० % निकाल लागला आहे. ४१० विद्यार्थ्यांपैकी २३८ विद्यार्थी  डिस्टिंग्शनमध्ये तर १७२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत  प्रथम क्रमांक वैष्णवी मिलिंद झवर ९५.२० % गुण मिळवून   प्रथम आली आहे. येथील  स्व. शेठ रा.ल.ललवाणी विद्यालयाचा निकाल १००% लागला असून विद्यालयातून प्रथम दिपाली सुकलाल चौधरी ९७.४० व द्वितीय अनुश्री राजेंद्र लोंढे ९६.४० % मिळवुन उत्तीर्ण झाले.  विशेष प्राविण्यासह २८ व प्रथम श्रेणीत ७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले .   सर्व विद्यालयात यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन करण्यात येत आहे. धी शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय गरुड,सचिव सतिशचंद्र काशीद, सहसचिव दीपक गरुड, प्राचार्य संजय उदार यांनी गरुड विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. डॉ. हेडगेवार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. कौमुदी साने, डॉ.कल्पक साने , सचिव कांतिलाल ललवाणी सर्व संचालक मंडळ विद्यालयाच्या प्राचार्या शिलाबाई पाटील , मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांनी श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. स्व. राजमल लखीचंद विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ईश्वरलाल जैन ,सचिव मनीष जैन, समन्वयक प्रा. अतुल साबद्रा, मुख्याध्यापक प्रमोद खलचे यांनी अभिनंदन केले आहे. कोविड १९ मुळे परिक्षा होऊ न शकल्याने ९ वी व १० वी अंर्तगत गुणांच्या आधारे निकाल लावण्यात आला.

Protected Content