शेंदूर्णी, प्रतिनिधी । येथील माजी जिल्हा परिषद सदस्य व शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन संजय गरुड यांचा वाढदिवस काल दि. २६ एप्रिल रोजी सोशियल डिस्टन्सचे सर्व नियम पाळून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
अप्पासाहेब र.भा.गरुड विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.डॉ.दिनेश पाटील यांनी चेअरमन संजय गरुड यांच्या वाढदिवानिमित्ताने एक आगळा वेगळा उपक्रम राबविला. त्यांनी शेंदूर्णी शहरातील सर्व पत्रकार व पहुर,शेंदूर्णी येथिल पोलीस बांधवांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले. या उपक्रमाचे पोलीस व पत्रकार बांधवांनी स्वागत केले आहे. पहुर पोलीस स्टेशनचे पीएसआय किरण बर्गे यांनी पोलिसांचे वतीने तर पत्रकाराचे वतीने विलास अहिरे यांनी मास्क, सॅनिटायझर किट स्वीकारले. कोरोना सारख्या राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी पोलीस रस्त्यावर उतरून जनतेच्या जीवितांचे रक्षण करण्यासाठी धडपडत आहेत. तर पत्रकार आपला जीव धोक्यात घालून वृत्तसंकलन करून दैनंदिन घडामोडीची माहिती व कोरोना विषयी जनजागृती करण्यात पुढाकार घेत आहे. अशा पत्रकार व पोलीस कर्मचाऱ्यांच्या या कार्याची दखल प्रा. डॉ. दिनेश पाटील यांनी घेतली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.