शेंदूर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील कोरोना बाधीतांच्या कुटुंबियांचे अहवाल निगेटीव्ह आढळून आल्याने शहरवासियांना दिलासा मिळाला आहे.
याबाबत वृत्त असे की, येथील सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या पत्नीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे शहरात आता पर्यंत तीन व्यक्ती कोरोना बाधित झाल्या असून त्यात दोन पुरुष व एका महिलेचा समावेश होता. या कोरोना बाधीतांच्या कुटुंबियांचे स्वॅब सँपल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या पत्नी व मुलाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे शेंदुर्णीवासियांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. तथापि, नागरिकांनी दक्षता घ्यावी व विना मास्क ,विना कारण घराबाहेर पडू नये योग्य सूचनांचे पालन केल्यास कोरोना रोखणे शक्य असल्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.