शेंदूर्णी प्रतिनिधी । शेंदुर्णी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी श्रीराम काशिनाथ काटे यांची नियुक्ती करण्यात आली. निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरूड यांचेहस्ते छोटेखानी कार्यक्रमात देण्यात आले.
आचार्य गजाननराव गरूड ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था कार्यालयात छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जामनेर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश पाटील, सचिन धनगर हे उपस्थित होते. यावेळी नियुक्ती पत्र स्विकारतांना नवनियुक्त शहराध्यक्ष श्रीराम काटे यांनी जोमाने संघटन उभारणी व पक्षाचे ध्येय धोरणे जनतेमध्ये पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच अल्पसंख्याक, दलित,इतर मागासवर्गीय घटकांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देणार असल्याचेही सांगितले आहे. श्रीराम काटे यांच्या नियुक्तीबद्दल जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत, तालुका उपाध्यक्ष प्रल्हाद बोरसे, डॉ.बाजीराव पाटील,युवा कार्यकर्ते स्नेहदीप गरूड, युवक तालुका उपाध्यक्ष सागर कुमावत यांनी अभिनंदन केले आहे.