शेंदुर्णी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

शेंदुर्णी ता. जामनेर (प्रतिनिधी) । राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती शासनाच्या कोरोना नियमावलीचे पालन करून उत्साहात साजारी करण्यात आला आहे. आज सकाळी ९ वाजता येथील गांधी चौकात छत्रपती शिवाजी महाराज अर्धाकृती पुतळ्याचे पूजन माजी जि.प.सदस्य संजय गरूड, माजी जि.प. सदस्य सागरमल जैन, माजी पं.स.सदस्य सुधाकर बारी यांच्यासह आदी शिवप्रेमी यांनी केले. 

यावेळी संजय गरूड यांनी  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर प्रकाश टाकला व आजच्या युगात शिवाजी महाराजांचे विचार युवकांनी अंगिकारावे असे आवाहन केले. यावेळी गरूड प्राथमिक प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी तुषार पाटील, अनुष्का सतीश नागणे या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांची कीर्ती व महती सांगितली. यावेळी स्नेहदीप गरूड, खलील पठाण, शकुर शेख, डॉ. अतुल पाटील, डॉ.विजय राठोड, प्रफुल्ल जैन, धीरज जैन, फारूक खाटीक, गजानन धनगर, योगेश गुजर व शिवप्रेमी उपस्थित होते.

शेंदूर्णी नगरपंचायतीत आयोजित कार्यक्रमात उपनगराध्यक्ष चंदाबाई अग्रवाल, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, माजी उपसरपंच गोविंद अग्रवाल, पंडित दीनदयाळ पतसंस्था चेअरमन अमृत खलसे, नगर अभियंता भैय्या पाटील, गटनेता रंजना धुमाळ, नगरसेवक निलेश थोरात, आलीम तडवी, राहुल धनगर, गणेश जोहरे, श्रीकृष्ण चौधरी, शाकिर पिंजारी, धीरज जैन, फारूक खाटीक उपस्थित होते.

यावेळी मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज याचे आदर्श व विचार जीवनासाठी प्रेरक असल्याने त्याचा सर्वांनी अंगीकार करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पुरेपुर पालन करण्यात आले. उपस्थितांनी मास्क व सामाजिक अंतर पालन करून कार्यक्रमात भाग घेतला तर येथिल शिवसेनेचे वतीने पहूर दर्जा हनुमान मंदिराजवळील नियोजित छत्रपती शिवाजी महामराज पुतळ्याचे जागेवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, तेव्हा छत्रपती प्रतिमा पूजन करून आरती करण्यात आली. यावेळी शिवसेना शहराध्यक्ष संजय सूर्यवंशी, विलास पाटील, उपतालुका प्रमुख सुनील अग्रवाल, सिद्धेश पाटील व शिवप्रेमी शिवसैनिक उपस्थित होते.

Protected Content