शेंदुर्णी प्रतिनिधी । येथील गरूड महाविद्यालयात आयक्यूएसीच्या माध्यमातून केंद्र शासन महाराष्ट्र शासन आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या आदेशानुसार संपूर्ण देशात असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर घरातूनच महाविद्यालयीन व कार्यालयीन कामकाज आणि त्याचा आढावा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे यशस्वीरित्या करण्यात येत आहे.
शेंदुर्णी सारख्या ग्रामीण भागात काम करत असतांना येणाऱ्या विविध अडचणीवर मात करत, उपलब्ध आधुनिक साधनसामग्रीचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल याचा विचार नजरेसमोर ठेवून आणि शासन आणि विद्यापीठाच्या आदेशानुसार देशात आणि राज्यात सुरु असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नियमांचे पालन करून महाविद्यालयीन कामकाज घरूनच करीत आहेत, सध्या महाविद्यालयाचे न्याक पुनःर्मुल्याकन तिसरे सायकल करीता ऑनलाईन पोर्टल स्वयं अभ्यास अहवालाकरिता सुरु आहे यामुळे न्याकने दिलेल्या सुचनेनुसार सदर अहवाल विहित मुदतीत जमा करणेकमी प्राचार्य डॉ. वासुदेव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व प्राध्यापक अभ्यास अहवाल तयार करण्याचे काम घरूनच करीत आहेत. या कामाचा आढावा घेणेकरिता तसेच युजीसी, नवी दिल्ली आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव तसेच सहसंचालक, उच्च शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे, कमी विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहणे, त्यांच्या अभ्यासक्रम विषयक, परीक्षा विषयक, अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी मदत करणे, विविध उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने आज महाविद्यालयीन आयक्यूएसीच्या वतीने प्राचार्य डॉ. वासुदेव पाटील, आयक्यूएसी समन्वयक उपप्राचार्य डॉ. श्याम साळुंखे यांच्या मार्गदर्शनाने तसेच सर्व प्राध्यापक यांच्या सहकार्याने व्हिडीओ कॉन्फरेन्सचे आयोजन करण्यात आले.
या व्हिडीओ कॉन्फरेन्स च्या माध्यमातून सर्वांना आपापल्या घरी सुरक्षित राहून सुदृढ आरोग्याच्या सूचना प्राचार्य यांनी दिल्या यासह आगामी काळात महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठाच्या वेळोवेळी येणाऱ्या सूचना यांचे पालन करून विद्यार्थी, महाविद्यालय हिताचे उपक्रम, परीक्षा, इ. संदर्भातील विविध सूचना देण्यात आल्यात. या व्हिडीओ कॉन्फरेन्स ला यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य डॉ. संजय भोळे, प्रा.अमर जावळे, डॉ.प्रशांत देशमुख, डॉ.दिनेश पाटील, डॉ.रोहिदास गवारे, प्रा.महेश पाटील, डॉ.सुजाता पाटील, डॉ.वसंत पतंगे, डॉ.योगिता चौधरी, डॉ.अजिनाथ जीवरग, प्रा. धम्मा धारगावे यांनी शेंदुर्णी, पहूर, जळगांव व जामनेर येथून सहभाग नोंदविला. महाविद्यालयाच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल धी शेंदुर्णी सेकंडरी एज्यूकेशन सोसायटीचे चेअरमन संजय गरुड, सचिव सागरमल जैन, सहसचिव दिपक गरुड, संचालक यु. यु. पाटील, संस्था समन्वयक संजय देशमुख व सर्व संस्था पदाधिकारी यांनी कौतुक केले आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन, नियोजन आणि संचालन प्राचार्य डॉ. वासुदेव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार आयक्यूएसी समन्वयक व उपप्राचार्य डॉ. श्याम साळुंखे यांनी सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने केले.