शेंदुर्णी ता.जामनेर (प्रतिनिधी)। येथील नगरपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी डॉक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यामानाने नागरिकांसाठी प्रभागनिहाय आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
शेंदुर्णीत दहा आरोग्य तपासणी पथक दाखल झाले आहे. यावेळी डॉ.राहुल सूर्यवंशी, नगरसेवक राहुल धनगर, शरद बारी, आशा सेविका सविता बारी, संतोष धनगर, माजी सरपंच प्रभाकर सपकाळ, राजू धनगर, विनोद धनगर, भागवत धनगर, शाकीर पिंजारी, श्रीराम काटे, आनंदा धनगर, हिरालाल धनगर, विलास धनगर, गजानन धनगर आदी उपस्थित होते.
वार्ड क्रमांक ५ मधील धनगर गल्लीत सदर योजनेची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतील मोहल्ला क्लिनिक आरोग्य तपासणीस सुरुवात करण्यात आली. यावेळी पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.सागर गरूड यांनी प्रतिमा पूजन करून अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. कोरोना विषाणू संसर्ग पासून दूर राहण्यासाठी पाळावयाची पथ्ये व घ्यायची काळजी याबद्दल उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. मोहल्ला क्लिनिक संकल्पना व उद्देश याविषयी डॉ. नीलम अग्रवाल यांनी माहिती दिली. प्रत्येक प्रभागात तपासणीचे पथके पोहोचणार असून नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी. मोहल्ला क्लिनिक मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन नगरपंचायत मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी केले.